Posts

Showing posts from February, 2022

प्रेम म्हणजे काय असतं?

Image
   फेब्रुवारी महिना सुरू झाला म्हणजे तमाम प्रेमी जीवांना वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डे चे! कित्येक शतकं अगोदर रोमन सम्राटाच्या मनाविरुद्ध सेंट व्हॅलेंटाईन याने अनेक प्रेमी जिवांना लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले होते. लग्न केल्यामुळे सैनिकांचे मन आपल्या कामावरून उडते म्हणून रोमन सम्राटाने आपल्या सैनिकांवर  लग्न न करण्याची सक्ती केली होती . राजाज्ञा चे उल्लंघन केल्यामुळे  सेंट व्हॅलेंटाईन यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. प्रेमासाठी त्यांनी 14 फेब्रुवारीला हसत-हसत हौतात्म्य पत्करलं त्यांच्या स्मृतीसाठी म्हणून हा दिवस जगभर 'प्रेम दिवस' म्हणून साजरा करतात.  सगळ्यात संस्कृतीमध्ये 'प्रेमाला' उच्च स्थान आहे. मग  ते प्रेमा आई-बाबांचे असु दे नाहीतर देव भक्ताचे असू दे, नाहीतर प्रियकर-प्रेयसीचे असू दे. पाडगावकरांच्या भाषेत म्हणायचे झाले तर म्हणता येईल,  'प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते'. प्रेम हे देण्याने वाढते. बळजबरीने मिळत नाही. खऱ्या प्रेमात स्वार्थ  नसतो.   प्रेम हे शरीरावर न करता नेहमी मनावर करावे. सत्यवान हा अल...