पहिली गं भुलाबाई...
महाराष्ट्र हे शेतीप्रधान, कृषीप्रधान राज्य आहे. शेती ही तर अगदी अनादी कालापासून केली जाते, त्यामुळेच शेती आणि लोकजीवन, लोकसंस्कृती या एकमेकांना फार पूरक गोष्टी आहेत. त्यातही महाराष्ट्रातील लोकजीवन, लोकसंस्कृती, कृषीसंस्कृती ही फार वैशिष्टय़पूर्ण, वैविध्यपूर्ण श्रीमंत आणि विविधांगी आहे. महाराष्ट्राच्या विविध प्रांतात भौगोलिक विविधतेमुळे लोकसंस्कृती, कृषीसंस्कृतीमध्ये, लोकजीवनामध्ये वैविध्य आढळून येते. त्यामुळेच महाराष्ट्राच्या कृषीसंस्कृतीची श्रीमंती फार अनोखी आहे. विदर्भात साजरा होणारा भुलाबाईचा उत्सव हा नवीन आलेल्या धान्याच्या पूजनासाठी, स्वागतासाठी आनंदाने साजरा केला जातो. विदर्भासह हा भुलाबाईचा सण मराठवाडय़ाच्या विदर्भालगतच्या काही जिल्ह्य़ांसह खान्देशातील जळगाव जिल्ह्य़ातपण साजरा होतो. भोंडला, भुलाबाई, हादगा या वेगवेगळ्या नावाने लोकपरंपरा पाळत असल्याचे दिसतं. मात्र भुलाबाईच्या उत्सवाची श्रीमंती ही विदर्भात फार जास्त पाहायला मिळते. आपल्या महाराष्ट्र राज्यातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील काही भागातील प्रसिद्ध लोक कथागीत महोत्सव म्हणजे भ...